Talegaon News : संध्या सोनवणे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जनरल हाॅस्पिटलमध्ये आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कर्मचारी संध्या संजय सोनवणे (वय 50) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा व सून असा परिवार आहे. तळेगाव स्टेशन (यशवंतनगर ) येथील युवा कार्यकर्ते अभिजित संजय सोनवणे यांच्या मातोश्री तर कामगार नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव शहर अध्यक्ष दिवंगत संजय सोनवणे यांच्या पत्नी होत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार निलेश लंके व निलेश लंके प्रतिष्ठान युवक अध्यक्ष विजय औटी व त्यांचे सहकारी यांनी सोनवणे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.