Talegaon News : संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील तेली समाजाच्या वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती मंगळवार (दि. 8) उत्साहात साजरी करण्यात आली.

तेली आळी येथील मारुती मंदिरात मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी तेली समाजाचे विश्वस्त देवेंद्र बारमुख, संदीप जगनाडे, राजू जगनाडे, सहदेव मखामले,कमलाकर कसाबी, मारुती दिवटे, दत्तात्रय उबाळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन संजय कसाबी व नंदकुमार किरवे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.