Talegaon News : शाम पोशेट्टी यांनी स्विकारला मुख्याधिकारी पदाचा पदभार!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी शाम पोशेट्टी यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार मंगळवारी (दि 4) दुपारी स्विकारला. यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्याधिकारी पोशेट्टी यांनी नगरपरिषदेतील खाते प्रमुखांची ओळख करून घेऊन त्यांच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. नगरपरिषदेतील उपस्थित पदाधिकारी मंडळींनी पोशेट्टी यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

फेब्रुवारी 2021 पासून रिक्त असलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी पदावर अखेर श्याम पोशेट्टी यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून सोमवार (दि 3) रोजी नियुक्ती करण्यात आली.

शासनाच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी पोशेट्टी यांची नियुक्ती केली. पोशेट्टी हे मुंबईतील नगर परिषद संचानलयात सहाय्यक आयुक्त गट- ब यापदावर कार्यरत होते.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची भिवंडी येथे उपायुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर मुख्याधिकारी पदाची जागा रिक्त होती. या जागेवर प्रभारी म्हणून चाकणचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे काम पाहत होते.

सध्या तळेगाव दाभाडे हद्दीमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी नवनियुक्त मुख्य अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.