Talegaon News : मायमर हाॅस्पिटलविरोधात शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मायमर हाॅस्पिटल विरोधात शिवसेनेच्या वतीने सोमवारी (दि.10) हाॅस्पिटलच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.

रविवारी (दि.9 ) रोजी सकाळी 7.30 वाजता हाॅस्पिटलमध्ये मध्ये कोरोनाचे उपचार घेत असलेले कार्ला येथील शिवसेना माजी शाखाप्रमुख सोमनाथ हुलावळे यांनी आयसीयूमध्ये आत्महत्या केली. हाॅस्पिटल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सोमनाथ हुलावळे यांनी आत्महत्या केली तसेच ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप नातेवाईकांनी केला होता.

हाॅस्पिटलवर कडक कारवाई झाली पाहिजे. यासाठी आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी बिल न भरल्यामुळे एका कोरोना रूग्णाचा मृतदेह तीन दिवस हाॅस्पिटलने डांबून ठेवला होता. खासदार श्रीरंग बारणे यांनी आवाज उठवल्यामुळे या मृतदेहाची सुटका झाली.

हे हाॅस्पिटल रुग्णांच्या नातेवाईकांशी अरेरावीची भाषा वापरते. कोरोना रुग्णांकडे लक्ष देत नाही. रुग्णांकडून अवाजवी बिल घेत असतात.अशा अनेक तक्रारी या हाॅस्पिटल विरोधात आहेत.त्यामुळे सरकारने हे हाॅस्पिटल ताब्यात घ्यावे.व या हाॅस्पिटल प्रशासनावर गुन्हा दाखल करावा यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, ज्येष्ठ नेते भारत ठाकूर,महिला आघाडी जिल्हा संघटीका शैलजा खंडागळे, विभागप्रमुख आनंता आंद्रे,भाऊसाहेब हुलावळे यांनी आंदोलनात मनोगत व्यक्त केले.

आंदोलनात संघटक अंकुश देशमुख, संघटक सुरेश गायकवाड, उपतालुका प्रमुख यशवंत तुर्डे, चंद्रकांत भोते, मदन शेडगे, अमित कुंभार,समन्वयक रमेश जाधव, महिला आघाडी मावळ संघटीका अनिता गोनते, भा .वि .से संघटक धनंजय नवघणे, शहरप्रमुख दत्ता भेगडे, भरत नायडू, सतीश इंगवले, प्रवीण ढोरे, सुनील हगवणे सिध्देश नलावडे, देवा खरटमल, नगरसेविका लोणावळा कल्पना आखाडे सिंधू परदेशी, संगीता कंधारे,  रुपाली आहेर, विभागप्रमुख राम सावंत, योगेश काकरे, जयदास ठाकर, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर,  सोमनाथ कोंडे, राहुल नखाते, अनिल ओव्हाळ व इतर शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी तळेगाव मधिल सर्व शिवसैनिक इत्यादी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.