_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon News : सातवीतील श्रावणी वांढेकरचे इस्रोच्या स्पर्धेत यश

एमपीसी न्यूज – इस्रोच्या वतीने आयोजित ‘भाविशिका प्रोग्रॅम’ स्पर्धेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या श्रावणी वांढेकरचे घवघवीत यश मिळवले आहे. मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियम स्कूलची श्रावणी विद्यार्थिनी असून, तिने या स्पर्धेत देशात 45 वा क्रमांक पटकाविला.

_MPC_DIR_MPU_II

इस्रोच्या ‘इंडो सायन्स एडुकेशन ट्रस्ट’ने ‘भाविशिका प्रोग्रॅम’ ही स्पर्धा आयोजित केली होती. ‌ या स्पर्धेमध्ये श्रावणी वांढेकर हिची निवड झाली. सर्वप्रथम तिने प्रत्यक्ष काम करणाऱ्या ‘स्पेस सॅटेलाईट’ या चर्चासत्रात भाग घेतला. प्रवेश परीक्षेत एकूण 950 विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यातून 78 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि तिने यातून 45 वा क्रमांक पटकाविला.

चार वर्षांसाठी हा उपक्रम आखला असून, उपक्रमाचा मुख्य विषय ‘कॅन-सॅट बेसिक्स’ आणि ‘टेलीस्कोप बेसिक्स हे आहेत. नॅशनल टेक्नॉलॉजी डेच्या वतीने श्रावणी वांढेकर हिने यूट्यूबवर 13 मे रोजी थेट प्रात्यक्षिक केले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल शाळाप्रशासन व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.