Talegaon News : श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे निधन 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील अध्यात्मिक (Talegaon News) गुरु श्रीकृष्ण तथा राजाभाऊ गोपीनाथ कर्वे गुरुजी (वय 94) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे मिलिंद, संदीप, संजय तीन मुलगे, तीन मुली, पुतणे, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने सेवेकरी वर्ग उपस्थित होता.

Pimpri News : शहरातून दोन दुचाकी चोरीला

यावेळी डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. सुचित्रा नागरे, हभप. चैतन्य महाराज कबीर , माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, संजय हुंडरे, संजय शेवाळे, माजी नगरसेवक अरुण माने, ॲड. प्रभाकर शेवाळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती जे.आर. भालेराव, लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, पंडित प्रकाश महाजन, बाळासाहेब कर्वे यांच्यासह सेवेकरी वर्ग उपस्थित होता.

यावेळी कर्वे गुरुजी यांनी दिलेल्या ओम श्री विश्वदर्शन देवताय नमः या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. डॉ. विश्वनाथ कराड, हभप चैतन्य महाराज कबीर, अरुण माने यांनी (Talegaon News) श्रद्धांजली समर्पित केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.