Talegaon News : श्रीराम पंडित यांचे निधन

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील रामनाथ पंडित संशोधन केंद्राचे मुख्य विश्वस्त श्रीराम कृष्ण पंडित (वय 88) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.1) रात्री निधन झाले. बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र, कन्या, सून, जामात, नातवंडे असा परिवार आहे.

पंडित यांच्या संशोधन केंद्रामध्ये सुमारे अडीच लाख ग्रंथ, 20  हजार ध्वनीमुद्रिका, दुर्मिळ वस्तू असा अत्यंत मौल्यवान संग्रह आहे. मराठी संगीत नाटकांचा जवळ जवळ संपूर्ण ठेवा त्यांनी जतन केला असून बालगंधर्वांचा ऑर्गन व पद्मभूषण पादकांसह अनेक वस्तू त्यांच्या संग्रहात आहेत.

श्रीराम पंडित इलेक्ट्रॉनिक इंजीनियर म्हणून 1955 साली भारत सरकारच्या वायुदलात नोकरीस होते. नंतर 1962  ते 1993  पर्यंत टाटा मूलभूत संशोधन केंद्रात त्यांनी सेवा बजावली. याच काळात त्यानी छंद म्हणून नाटकाची पुस्तके, ध्वनीमुद्रिका आदींचा संग्रह करायला आरंभ केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.