Talegaon News : आरोग्य सेविका पूनम मकासरे यांचा आमदार शेळके यांच्या हस्ते विशेष सन्मान

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील आरोग्य सेविका पूनम मकासरे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना खडकी मेथाडिस्ट मराठी चर्चच्या वतीने कोरोना आरोग्य सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या  पुरस्कारानिमित्त आमदार सुनील शेळके यांनीही मकासरे यांचा प्रशस्ती पत्र देऊन विशेष गौरव केला.

कोरोना काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना मोठ्या हिमतीने कोरोना रूग्णांना उपचार मिळवून देणे, त्यांना मानसिक आधार देणे आदी कार्य पूनम मकासरे यांनी केले.

रुग्ण सेवा करताना त्यांनी कोरोना विषयक जनजागृतीही केली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना खडकी मेथाडिस्ट मराठी चर्चच्या वतीने कोरोना आरोग्य सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आरोग्य सेविका मकासरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही विशेष प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी निवेदक अनिल धर्माधिकारी, अतुल मराठे, सरपंच दत्तात्रय पडवळ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.