Talegaon News : रोटरी क्लबतर्फे पोलीस निरीक्षक भास्कर मधुकर जाधव यांना विशेष सेवा पुरस्कार

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी ही संस्था मावळ पंचक्रोशीतील कार्यतत्पर सेवाभावी व्यक्तींना ‘रोटरी व्होकेशनल सर्विस’ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा स्तुत्य उपक्रम दरवर्षी घेते.

covid-19 च्या आपत्तीमध्ये जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या कर्तव्यतत्पर त्यामुळे व पोलीस खात्यातील सेवा लक्षात घेऊन तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर मधुकर जाधव यांना वर्ष 2020 -21 चा रोटरी व्होकेशनल सर्विस अ‍ॅवाॅर्ड, रोटरी अध्यक्षा रजनीगंधा खांडगे व रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीचे संस्थापक संतोष खांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी तळेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तसेच रो. सुदाम दाभाडे, रो. प्रवीण भोसले, रो. मिलिंद शेलार, रो. सचिन कोळवणकर, रो. गौरी पाटील, रो. दशरथ जांभुळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सत्कारास उत्तर देताना भास्कर जाधव यांनी हा पुरस्कार केवळ प्रातिनिधीक स्वरूपात स्वीकारत असून या पुरस्काराचे खरे मानकरी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आहेत असे मनोगत व्यक्त केले.

या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन रोटरी सदस्य यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो अनिल धर्माधिकारी यांनी केले. तर आभार रो. शंकर हदिमानी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.