Talegaon News : हॉस्पिटल व रुग्णांसाठी सक्षम समन्वयक व्यवस्था सुरु करा : रवींद्र माने

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल व रुग्ण यांच्यासाठी सक्षम समन्वयक व्यवस्था सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तळेगावचे शहराध्यक्ष रवींद्र माने यांनी यांनी केली आहे.

याबाबत माने यांनी सोमवारी (दि.२६) मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना या मागणीचे निवेदन दिले. नगरसेविका काजल गटे, सरचिटणीस प्रदीप गटे, विनायक भेगडे आदी उपस्थित होते.

निवेदन म्हटले आहे की, मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांची कोविड हॉस्पिटल, व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड व बेड शोधण्यासाठी दमछाक होते. रुग्ण उपचारासाठी दाखल केल्यावर हॉस्पिटल व्यवस्थापन रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित माहिती देत नाहीत.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ लाभार्थ्यांना न देता त्यांच्याकडून हजारो रुपये घेतले जातात. हॉस्पिटल व्यवस्थापनाने रुग्णालयाच्या दर्शनी भागात सर्व माहिती फलक लावावे, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

या फलकावर कोविड हॉस्पिटलची नावे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड, रुग्ण दाखल व घरी सोडलेले रुग्ण दर तासाला अद्ययावत माहिती, महात्मा फुले जन आरोग्य योजना,  रुग्ण व औषधोपचार याबाबत माहिती देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी,  त्यांचे नाव मोबाईल नंबर   तसेच हॉस्पिटलनिहाय रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध संख्या आदी माहितीचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.