Talegaon News : वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनच्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुभाष दाभाडे यांना सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनच्या मान्यतेने पहिल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ऑर्डनन्स डेपोमधील कार्यसमिती सदस्य व जेसीएम सुभाष चंद्रकांत दाभाडे यांनी पॉईंट फायटिंग स्पर्धेत 80 ते 84 वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र वाको किक बॉक्सिंगचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी अहमदनगर येथे केले होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याकडून 5 खेळाडूंनी पदक पटकावली. सुवर्ण पदक -सुभाष दाभाडे, किशोर दाभाडे, ऋतुजा सुर्वे, रौप्य पदक – मनोज कठायत, कांस्य पदक-विराज गुप्ता यांनी पटकावले.

त्यामध्ये सुवर्णपदक पटकावलेले दाभाडे यांची 26 ते 29 ऑगस्ट 2021 कालावधी मध्ये गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून सुभाष दाभाडे यांनी राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केल्याने त्यांचे त्यानिमित्त डेपोमधील कामगारांनी कौतुक करून सत्कार केला.

यावेळी ऑर्डनन्स डेपोचे कमांडन्ट कर्नल नितीन नहारिया व भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ कामगार नेते पंडित बालघरे, कामगार केसरी दिपक दाभाडे, केशव काळोखे, बाबासाहेब कातोरे हे उपस्थित होते.त्यांनी पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.