Talegaon News : आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग स्पर्धेच्या दोन्ही स्तरात अदित्री व्यास हिचे यश

एमपीसी न्यूज – अदित्री अभय व्यास हिने दहा वर्षांखालील वयोगटात आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. अदित्री तळेगावची रहिवासी असून पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत ती शिक्षण घेते.

गणेश फेस्टिव्हल निमित्ताने हॅरिटास चॅरिटेबल ट्रस्ट, स्टुडिओ मार्स अँड फॉरच्युन कन्सल्टंट व माईंड बॉडी योगा इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धा घेण्यात आली. 17 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या स्पर्धेचे दोन स्तर मिळून निष्कर्ष काढण्यात आला.

पहिल्या स्तरात मानांकन श्रेणी देण्यात आली त्यात अदित्रीला ‘अ’ श्रेणी मिळाली तर, दुसऱ्या स्तरात ज्यांना उच्च श्रेणी मिळाली फक्त त्यांचेच योगा प्रात्यक्षिके परत एकदा योगतज्ञ यांच्याकडून परिक्षण करण्यात आले. यापैकी सर्वोच्च 6 क्रमांक काढण्यात आले दुसऱ्या स्तरात अदित्री हिने चतुर्थ क्रमांक पटकावत नेत्रदिपक यश मिळवले.

सद्गुरू श्री गजानन महाराज, योगशिक्षक मनाली, आजी, आजोबा, आई प्रियंका अभय व्यास ज्यासुद्धा वॉलीबॉल मधील कलर कोड धारक आहेत आणि सध्या आय टी क्षेत्रात कार्यरत आहेत, वडील अभय सुरेश व्यास, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग यांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे अदित्री व्यास हिने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.