Talegaon News : सुखदा टिळे या विद्यार्थिनीने माती आणि रंग वापरून साकारली गणेशमूर्ती

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सुखदा श्रीपाद टिळे या विद्यार्थिनीने माती आणि रंग वापरून हाताने सुबक गणेशमूर्ती साकारली आहे. या गणेशमूर्तीची स्थापना घरात करण्यात आली आहे. 

इयत्ता आठवीत शिकणारी सुखदा ही माऊंट सेंट शाळेची विद्यार्थिनी असून, तिला चित्रकला आणि क्लेपासून विविध कलाकृती साकारण्याचा छंद आहे. गणेशमूर्ती साकारण्यासाठी पालकांचे तिला सहकार्य लाभले. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी सुखदाला दोन दिवस लागले.

सुखदा ‘माऊली हॉस्पिटल’च्या डॉ. श्रीपाद टिळे आणि डॉ. सारिका टिळे यांची कन्या आहे. डॉ. टिळे हे स्वतः उत्तम चित्रकार आणि कवी आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.