Talegaon News : सुशीलाताई शेलार राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुशीलाताई आण्णासाहेब शेलार यांना यंदाच्या राजमाता जिजाऊ पुरस्काराने काल सन्मानित करण्यात आले. वडगाव मावळ येथील शिवजयंती उत्सव समितीने त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान केला.

वडगाव मावळ येथील शिवजयंती उत्सव समिती वर्ष 42 वे या समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी सांस्कृतिक, कला, क्रीडा, कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विविध क्षेत्रात म्हणजेच कृषी, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केल्या जातो.

यावर्षीच्या राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी तळेगाव दाभाडे येथील शेलार परिवार, या शेलार परिवारातील माता श्रीमती सुशीलाताई अण्णासाहेब शेलार यांना या वर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात हजारोंच्या उपस्थितीत दिला जातो. परंतु यावर्षी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे सन्मानार्थींना शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी घरी येऊन पुरस्कार प्रदान केलेला आहे.

पुरस्कार देण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष भास्कर आप्पा म्हळसकर, भूषण मुथा, नगरसेवक किरण म्हाळसकर, नगरसेवक प्रसाद पिंगळे, अ‍ॅड. विजय जाधव, अरुण वाघमारे,अतुल राऊत, शंकर भोंडवे, शेखर वहिले, सुनील गायकवाड तसेच सर्व शेलार कुटुंबीय उपस्थित होते.

भास्कर आप्पा म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय काशिनाथ दादा शेलार, अण्णासाहेब शेलार आणि शेलार परिवार यांच्या विषयी असलेल्या भावना आपल्या भाषणात व्यक्त केल्या.

सूत्रसंचालन भूषण मुथा यांनी केले तर आभार शेखर वहीले यांनी मानले. शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कृतज्ञता व्यक्त करून नंदकुमार शेलार यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.