Talegaon News: तळेगाव शहराचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना पीएचडी पदवी

तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने वाघमोडे यांचा सत्कार

0

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना मागील आठवड्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. वाघमोडे यांच्या या यशाबद्दल तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी पीएचडी पदवीप्राप्त केल्याबद्दल तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा तळेगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन सत्कार करण्यात आला.

डॉ वाघमोडे हे सन 2016 पासून सुमारे साडेचार वर्ष त्यासाठी अभ्यास करीत होते. तळेगाव व इतर शहरांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असताना देखील पोलीस खात्याच्या जबाबदाऱ्या पार पडून जसा वेळ मिळेल तसा जास्तीत जास्त सकाळ व संध्याकाळी अभ्यास करून त्यांनी ही पीएचडी प्राप्त केलेली आहे.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार एस. एन. गोपाळे यांनी पोलीस खात्याची शान व तळेगावकरांचा मान वाढविल्याबद्दल डॉ. वाघमोडे यांचे अभिनंदन केले.

तसेच साप्ताहिक अंबरचे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार व किर्तनकार सुरेश साखवळकर यांनी असाध्य ते साध्य l करिता सायास l कारण अभ्यास तुका म्हणे ll या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे डॉ. वाघमोडे यांनी केलेले प्रयत्न व त्याला आलेले यश हे तळेगावकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

यावेळी तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे, बी एम भसे, सुनील वाळुंज, उपाध्यक्ष तात्यासाहेब धांडे, सचिव अतुल पवार, श्रीकांत चेपे यांनी देखील अभिनंदन करून अध्यक्षांच्या हस्ते डॉ. वाघमोडे यांना शाल, पुष्पगुच्छ व तळेगावचा ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. व पुढील वाटचालीस पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

 

पोलिसांची प्रतिमा उजळ करणारे यश
पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आता डॉ. वाघमोडे झाले आहेत. व्यवस्थापनातील त्यांचे संशोधनकार्य गेल्या 4 वर्षातील अभ्यास, चिकाटी आणि शिक्षणाची आस यातून पीएच.डी. च्या रूपाने साकारले आहे. पोलीस खात्यातील 24 तास ड्युटीच्या कर्तव्यावर व्यस्त असूनही त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली. आई वडील आणि गुरुजनांचे आशीर्वाद कामी आले. पोलिसांची प्रतिमा अधिक उजळ होईल, असेच हे यश आहे.

‘…डॉ. अमरनाथ वाघमोडे ‘ असे बातम्यांना लिहिताना, बोलताना आम्हा पत्रकारांना देखील हे तीन शब्द नेहमी आनंदाचे वाटतील. अशा शब्दांत एमपीसी न्यूजच्या वतीने पत्रकार प्रभाकर तुमकर यांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.