Talegaon News : भारती विद्यापीठातर्फे घेतलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत तळेगावची विद्यार्थिनी राज्यात प्रथम

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठातर्फे फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिस्थ परीक्षेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयातील विद्यार्थिनी इंद्रायणी उदयसिंग ठाकूर हिने इयत्ता दहावी इंग्रजी ॲडव्हान्स्ड परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

तिने या परीक्षेत 80 पैकी 80 गुण मिळविले आहेत. तिला 1000 रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्याबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा, मुख्याध्यापक कैलास पारधी, पर्यवेक्षक बाबाराव अंभोरे यांनी अभिनंदन केले तसेच इंग्रजी विषयाची उत्तम तयारी करून घेणाऱ्या अध्यापिका सौ. सुनीता कळमकर यांनी तिची तयारी करून घेतली होती.

शाळेचे ज्येष्ठ अध्यापक सुदाम वाळुंज, पांडुरंग पोटे, सुनंदा झगडे आणि सर्व अध्यापक आणि कर्मचारी यांनीही अभिनंदन केले त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.