Talegaon News : भारती विद्यापीठाच्या इंग्रजी अ‍ॅडव्हान्स परीक्षेत तळेगावची सिद्धी पाटील राज्यात प्रथम

एमपीसी न्यूज – सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थिनी सिद्धी दादासाहेब पाटील इयत्ता 10 वी (2020-21) ही भारती विद्यापीठ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी अ‍ॅडव्हान्स परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे.

सिद्धी दादासाहेब पाटील व मार्गदर्शक शिक्षिका कल्याणी जोशी बाईंचे या यशाबद्दल मुख्याध्यापिका रेखा परदेशी, संस्था अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, अंमलबजावणी अधिकारी अनंत भोपळे, कार्यवाह प्रमोद देशक, शिक्षण समिती सदस्य डॉक्टर ज्योती चोळकर, विश्वास देशपांडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.