_MPC_DIR_MPU_III

Talegaon News : ‘टीडीएफ व शिक्षक भारती शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी बांधील’

एमपीसीन्यूज : शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त संघटनेमध्ये आहे. त्यामुळे कोणत्या राजकिय पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे न जाता संघटनेच्या उमेदवाराला निवडून द्या. जेणेकरून आपल्या समस्या सभागृहात मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात टीडीएफ व शिक्षक भारती शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी व समस्या सोडवण्यासाठी बांधील आहे. त्यामूळे या संघटनेचा उमेदवार निवडून येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जी. के. थोरात यांनी केले.

टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघ यांची मतदार आढावा व बुथ नियोजन बैठक तळेगाव येथे संपन्न झाली. यावेळी विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाचे टीडीएफ व शिक्षक भारतीचे संयुक्त उमेदवार थोरात बोलत होते. तत्पूर्वी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष, उद्योजक रामदास काकडे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना  सहकार्य करण्याचे आवाहन केले.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष स्नेहल बाळसराफ, टीडीएफचे तालुका अध्यक्ष दिनेश टाकवे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अशोक धनोकार, संस्थाचालक शिवाजी टाकवे, मुख्याध्यापक बाबुराव नवले आदींच्या हस्ते थोरात यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जेष्ठ शिक्षक राधाकृष्ण येणारे, प्रा.महादेव सांगळे, डाॅ. संदीप गाडेकर, प्रविणकुमार हुलावळे, शिक्षक पतसंस्था संचालक धनकुमार शिंदे, टिडीएफचे पुणे शहर सचिव संतोष थोरात आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1