Talegaon News : विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची आवड शिक्षकांनी निर्माण करावी – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाची आवड शिक्षकांनी निर्माण करावी. असे आवाहन माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी केले.

येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल मधील ‘स्टुडंट नर्सरी’च्या उद्घाटन प्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भेगडे बोलत होते.

यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाळेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, सरचिटणीस नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश म्हस्के, संचालक दामोदर शिंदे, महेश शहा, विनायक अभ्यंकर, वसंत भेगडे, सोनबा गोपाळे गुरूजी, शंकर नारखेडे, अविनाश पाटील, सुहास गरुड उपस्थित होते.

शाळेने यापूर्वी पर्यावरण पूरक असे अनेक उपक्रम राबवले असून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपल्या नर्सरी उद्यानात एका रोपांची निर्मिती करणार आहे. पाहुण्यांनी प्रत्येकी एक रोपाची लागवड यावेळी केली. या कार्यक्रमाचे आयोजन शाळा उपाध्यक्ष अविनाश पाटील व प्राचार्य प्रणिती गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा टेकवडे यांनी केले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.