गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Talegaon News : शहीद भगतसिंग यांचे चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी-आमदार सुनिल शेळके

एमपीसीन्यूज :  शहीद भगतसिंग यांनी अतिशय कमी वयात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला.  भगतसिंग यांचे चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार सुनिल शेळके यांनी केले.

आ.  शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भगत सिंह यांच्या प्रतिमेस आमदार सुनिल शेळके यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

यावेळी नारायण मालपोटे, श्रीकांत टकले, मयूर झोडगे, अनिल मालपोटे, गणेश थिटे, सागर बोडके, कल्पेश मराठे आदी उपस्थित होते.

शहीद भगतसिंग यांनी अतिशय कमी वयात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. लोकांना जागरूक करण्यासाठी त्यांनी वीर, अर्जुन, प्रताप इत्यादी अनेक दैनिकांमध्ये लेखन केले. त्यांचे तेव्हाचे लेख आजही युवकांना प्रेरित करत आहेत. अशा या आदर्श क्रांतिकारी, पुरोगामी, विज्ञानवादी व दूरदृष्टी विचार असणाऱ्या भगत सिंह यांची आज ११३ वी जयंती आहे. या निमित्त युवकांनी त्यांची प्रेरणा घेऊन नवनवीन संकल्प करून आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी, असा संदेश आमदार शेळके यांनी युवकांना दिला.

Latest news
Related news