Talegaon News : छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पराक्रम गाजवता न आलेल्या मराठवाड्याच्या लोकांनी ती कसर मुक्ती संग्रामात भरून काढली – परळीकर

एमपीसी न्यूज (जयश्री कुलकर्णी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पराक्रम गाजवता न आलेल्या मराठवाड्याच्या लोकांनी ती कसर मराठवाडा मुक्ती संग्रामात भरून काढली, असे उद्गार पंडित किरण परळीकर यांनी काढले.

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त डॉ. लता पुणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला परळीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. नीता मुरुगकर, एलआयसी विकास अधिकारी गुणवंत मारपले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे, पंडित विनोद भूषण आल्पे, सतीश भोपळे, ‘अंबर’ साप्ताहिकाचे सुरेश साखवळकर आदी उपस्थित होते.

किरण परळीकर म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्त करून भारतात विलीन करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षाला स्मरुन 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत असतो.’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले साखवळकर म्हणाले, ‘मराठवाडा मुक्ती संग्राम सरदार वल्लभ भाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ यासारख्या अनेकांच्या संघर्षातून यशस्वी झाला आहे. आजच्या तरुण पिढीला हा इतिहास समजला पाहिजे. त्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे.’

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षिप्रसाधन भरड, विठ्ठल भरड, प्रभाकर कुलकर्णी, डॉ. सूर्यकांत पुणे, उर्मिला छाजेड यांचे सहकार्य लाभले. डॉ. लता पुणे यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी ताले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.