Talegaon News : आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत मावळातील गावांसाठी सहा घंटागाड्या उपलब्ध

एमपीसी न्यूज – आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत मावळातील आंबी, मंगरूळ, निगडे, आंबळे व कामशेत या ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी 58 लाख 80 हजार रुपयांच्या 6 घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आंबी, मंगरूळ, निगडे, आंबळे या गावांसाठी प्रत्येकी एक व कामशेत गावासाठी दोन घंटागाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. कचरा संकलनाच्या गाड्यांचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते सोमवारी (दि.2) तळेगाव दाभाडे येथे लोकार्पण करण्यात आले.

“मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरीकरण वाढत आहे. याचा अतिरिक्त ताण ग्रामपंचायतीकडून पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांवर होत आहे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये यासाठी घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करावी. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कचरा वेळेवर उचलला जावा. नागरिकांनी देखील ओला व सुका कचरा वर्गीकरण करून सहकार्य करावे. साचणाऱ्या कचऱ्यामुळे इतर आजार व दुर्गंधी पसरू नये यासाठी या कचरा वाहतूक घंटागाडीचे योग्य नियोजन ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींकडून व्हावे, अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, कामशेत-खडकाळा ग्रुप ग्रामपंचायत सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच निलेश दाभाडे, ग्रामसेवक विलास काळे, आंबी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संगीता भरत घोजगे, ग्रामसेवक बालाजी सुरवसे, निगडे ग्रामपंचायतीचे सरपंच सविता बबुशा भांगरे, ग्रामसेवक शशिकांत जाधव, ग्रुप ग्रामपंचायत आंबळेचे सरपंच मोहन घोलप, उपसरपंच पुनम हांडे, ग्रामसेवक प्रमोद बनसोडे व ग्रामपंचायत सदस्य रोहिणी मुथा, वैशाली इंगवले, रोहिणी दौंडे, अनिता गायखे, परेश बरदाडे, निलेश गायखे, दत्तात्रय रावते, दत्तात्रय शिंदे, अभिजित शिनगारे, संजय पडवकर, विजय दौंडे, प्रदीप बनसोडे, मंगल घोजगे, माधुरी जाधव, सारिका धुमाळ, भानुदास दरेकर, गणेश भांगरे, सीताराम ठाकर, नवनाथ मोढवे, सुरेखा नखाते आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.