Talegaon News: पंचायत समिती व तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षण

एमपीसी न्यूज –  मावळ तालुका पंचायत समिती ( शिक्षण विभाग) व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा सुधारण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण सोमवारी घेण्यात आले.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन रोटरी अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, रो. सचिव सचिन कोळवणकर, रो. खजिनदार मिलिंद शेलार, रो. शंकर हदीमनी, रो. विल्सेन सालेर, रो. प्रवीण जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 मावळ तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम वाडी-वस्तीतील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचल्याशिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे बलशाली भारत हे स्वप्न पूर्ण होणार नाही. हे सर्व काही माझ्या शिक्षक बांधवांच्या हातात आहे. रोटरी क्लब हे विविध प्रकारचे शिक्षणाच्या सुविधा व कार्यक्रम राबवीत असतात. आमचे सहकार्य व मदत कायम राहील, असे रो. रजनीगंधा खांडगे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले.

गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी रोटरी क्लबचे आभार मानले तसेच जिल्हास्तरावरून मार्गदर्शनासाठी आलेल्या तज्ज्ञांचे स्वागत केले. सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करावे व प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले.

प्रशिक्षणाचे नियोजन रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी व तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व विषयतज्ज्ञ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख रामराव जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन विषयतज्ज्ञ रूपाली शेळके यांनी केले तर आभार रो. अनिल धर्माधिकारी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.