Talegaon News: कोरोना योद्धा पत्रकारांना तळेगाव शहर पत्रकार संघाकडून श्रद्धांजली

या सभेत कै.दत्तात्रय गवळी यांनी सदैव मावळ तालुक्यातील पत्रकारांसाठी केलेल्या योगदानाची विस्तृत चर्चा करण्यात आली. अनेक कठीण प्रसंगात मध्ये त्यांनी पत्रकारांना दिलेला आधार या सभेत व्यक्त करण्यात आला.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात माध्यम प्रतिनिधी देखील जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. समाजाच्या सर्व स्तरांशी जोडल्या गेल्यामुळे अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे जिल्ह्यातील दोन पत्रकारांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला. तळेगाव शहर पत्रकार संघाकडून या दोन पत्रकार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मावळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय गवळी व टीव्ही 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनामुळे तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तळेगाव स्टेशन येथील तळेगाव शहर पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या शोकसभेमध्ये अध्यक्षपदी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, सोनबा गोपाळे गुरुजी, मनोहर दाभाडे यांनी कै. दत्तात्रय गवळी व कै. पांडुरंग रायकर यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केली.

या सभेत कै.दत्तात्रय गवळी यांनी सदैव मावळ तालुक्यातील पत्रकारांसाठी केलेल्या योगदानाची विस्तृत चर्चा करण्यात आली. अनेक कठीण प्रसंगात मध्ये त्यांनी पत्रकारांना दिलेला आधार या सभेत व्यक्त करण्यात आला. तसेच टीव्ही 9 चे वार्ताहार कै. पांडुरंग रायकर यांचेवर कोरोणा संक्रमण झाल्यानंतर उपचारांमध्ये झालेल्या दिरंगाईबाबत खंत व्यक्त करण्यात आली. एका उमद्या पत्रकाराला उपचारादरम्यान झालेल्या दिरंगाईमुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. याबद्दल दुःखद भावना व्यक्त केल्या.

या शोकसभेचे नियोजन तळेगाव शहर पत्रकार संघाचे सचिव अतुल पवार व श्रीकांत चेपे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.