-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon News : ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकी दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – जुना पुणे मुंबई महामार्गावरुन दुचाकीवरून ट्रिपलसीट जात असताना ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. 18) रात्री सव्वानऊ वाजता झाला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

सोनू दत्तात्रय केदारी (वय 22) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजय आगविले आणि दुचाकी चालक अल्पवयीन मुलगा हे दोघेजण जखमी झाले आहेत. मयत सोनू केदारी यांचा मामा मारुती बाबू ठाकर (वय 35, रा. आळंदी) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मयत भाचा सोनू केदारी आणि त्याचे दोन मित्र सोनू याच्या दुचाकीवरुन जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात होते. ते हॉटेल सुवर्णाच्या समोर आले असता त्यातील अल्पवयीन दुचाकीस्वाराने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. त्यात राजू याचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले. दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.