Talegaon News : सरस्वती विद्यामंदिरचा उदयन पाळेकर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात 25वा

एमपीसीन्यूज : नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत तळेगावातील सरस्वती विद्यामंदिरचा उदयन कुलदीप पाळेकर हा राज्यात 25  वा आला असून या परीक्षेत मावळ तालुक्यातून पात्र झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे.

सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिरची उज्वल परंपरा उदयन पालेकर याने कायम राखली आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा सरस्वती विद्यामंदिर शाळेचा निकाल 70 टक्के लागला.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, अंमलबजावणी अधिकारी अनंत भोपळे , शिक्षण समिती सदस्य विश्वास देशपांडे, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, वर्ग शिक्षिका सुरेखा रासकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या त्याचे आईवडील सौ.शीतल व कुलदीप पाळेकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.