Talegaon News : तळेगावात लसीकरण नावनोंदणी केंद्र सुरु

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे त्या अंतर्गत नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने मोफत कोरोना लसीकरण नावनोंदणी केंद्राचा शुभारंभ संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

मोफत कोरोना लसीकरण नावनोंदणी केंद्राचा शुभारंभ नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, दिलीप खळदे,आनंद भेगडे नगरसेविका संगीता शेळके, मंगल भेगडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम सुरु झाली व नागरिकांना लसीकरण देण्यास सुरुवात झाली. तळेगाव नागरिकांचे कोरोनापासून बचाव व्हावा या हेतूने नगरसेवक नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्टस फौंडेशन यांच्यावतीने मोफत कोरोना लसीकरण पवना हॉस्पिटल, सोमाटणे व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी नाव नोंदणी केंद्र भेगडे आळी चौक, तळेगाव दाभाडे येथे उभारण्यात आल्याचे नगरसेवक संतोष भेगडे यांनी सांगितले.

नावनोंदणी झाल्यावर नागरिकांना लसीकरणासाठी पवना हॉस्पिटल येथे जाणे-येणेसाठी मोफत बसची सोय सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. भेगडे आळी येथील लसीकरण नाव नोंदणी केंद्र बुधवार दिनांक 07 एप्रिल 2021 ते 21 एप्रिल 2021 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 02 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी नाव नोंदणी केंद्रावर येताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आपली व आपल्या कुटुंबाची या जीवघेण्या कोरोना रोगापासून संरक्षण करावे,  असे आवाहन नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.