Talegaon News : नागरीक मंचच्या अध्यक्षपदी वसंत भापकर तर सचिवपदी निरंजन जहागीरदार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील शहरातील समस्या सोडविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नागरिक मंच तळेगाव दाभाडे या संघटनेच्या अध्यक्षपदी वसंत भापकर तर सचिवपदी पुन्हा दुसऱ्यांदा निरंजन जहागीरदार यांची निवड करण्यात आली.

संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

_MPC_DIR_MPU_II

पुढीलप्रमाणे पदाधिकारी व सदस्य
अध्यक्ष- वसंत भापकर
उपाध्यक्ष- रमेश पाटील, मिलिंद देशपांडे
सचिव- निरंजन जहागीरदार
सहसचिव- सुधीर हर्षे, उदय भेगडे
कोषाध्यक्ष- श्रीनिवास राऊत
सह कोषाध्यक्ष- अखिल बोकडे
सदस्य- चेतन पटवा, नितीन शास्त्री, अजित गाडगीळ, सौ नंदा हडकर, शामराव काळे, प्रकाश घाणेकर, प्रकाश जोशी, गिरीश गांधी आदीजण आहेत.

हे पदाधिकारी मंडळ व सदस्य सन 2021 ते 2024 असे तीन वर्ष कालावधीसाठी कामकाज पाहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.