Talegaon News : सांगुर्डी कान्हेवाडी वि.का.स.सोसायटी संचालकपदी वसंत भसे पाटील बिनविरोध

संचालक रघुनाथ भसे यांनी १४ ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

0

एमपीसी न्यूज – सांगुर्डी कान्हेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटीच्या संचालकपदी वसंत भसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

संचालक रघुनाथ भसे यांनी १४ ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष संभाजी भसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. वसंत भसे यांचा एकमेव अर्ज आल्याने सचिव संतोष डांगले यांनी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर माजी अध्यक्ष कृष्णा भसे व माजी तहसिलदार महादेव भसे यांच्या हस्ते वसंत भसे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोपट काळे, निवृत्ती भोसले, अंकुश भसे, विश्वनाथ येवले, संतोष भसे, विजय चव्हाण, अर्जून भसे यांनी  अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व संचालक मंडळ तसेच गणेश भसे, दिनकर भसे, नंदू भसे, तानाजी काळे या मान्यवरांसह दोन्ही गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते. बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केल्याबद्दल वसंत भसे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.