Talegaon News : वीरांगना महिला विकास संस्थेच्या अध्यक्षपदी वीणा दाभाडे यांची निवड

एमपीसी न्यूज – महिलांसाठी आर्थिक सक्षम होण्यासाठी स्वयंव्यवसाय निर्मिती करणाऱ्या वीरांगना महिला विकास संस्थेच्या अध्यक्षपदी वीणा विशाल दाभाडे यांची निवड करण्यात आली.

या निवडीचे पत्र वीरांगना महिला विकास संस्थेच्या संस्थापिका निलीमा दाभाडे यांनी दिले. यावेळी नगरसेविका विभावरी दाभाडे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हेमलता खळदे, तनुजा दाभाडे, शैलजा काळोखे, अल्पना हुंडारे, रजनी ठाकुर, चारूशीला काटे, सुरेखा दाभाडे, नेहा गराडे, सोनाली शेलार आदी उपस्थित होत्या.

वीरांगना महिला विकास संस्थेच्या वतीने महिलांना आर्थिक सक्षमता निर्माण व्हावी, म्हणून अनेक घरगुती व्यवसायांना प्रेरणा दिली जाते. तसेच व्यवसायाचे प्रशिक्षण व विक्रीचे मार्केट देखील दिले जाते.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दाभाडे म्हणाल्या भविष्य काळामध्ये महिलांना अधिकाअधिक व्यवसाय निर्माण करून देऊन आर्थिक सक्षम करण्याचे ध्येय असेल. दाभाडे यांनी या अगोदर शारदीय नवरात्र उत्सव समितीचे उपाध्यक्षपद भूषवले आहे.

नवनियुक्त इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे
उपाध्यक्ष – शैलजा काळोखे
खजिनदार – अल्पना हुंडारे
सहसचिव – सुरेखा दाभाडे,
सचिव – रजनी ठाकुर,
सदस्य- तनुजा दाभाडे, हेमलता खळदे, सोनाली शेलार, नेहा गराडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.