Talegaon News : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – सालाबाद प्रमाणे यावर्षीचा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा कोरोना महामारीच्या संकटामुळे व शासकीय बंधनामुळे नियमांचे पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

त्यामुळे सकाळी 5 ते 7 महापूजा, अभिषेक व काकड आरती, डोळसनाथ महिला मंडळाचे सायंकाळी भजन रात्री 8 वा महाराजांची आरती व देव जन्माच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व डोळसनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय तथा बाळा विश्वनाथराव भेगडे यांच्या हस्ते महापूजा काकड आरती झाली. रात्री 10.30 ते 12.30 देवजन्म कीर्तन दत्तात्रय जोशी महाराज, देहू यांचे झाले. त्यांना ट्रस्टच्या वतीने पुणे भाजपा अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.

_MPC_DIR_MPU_II

जन्मोत्सव सोहळ्यातील प्रथम दिवशी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शंकरराव शेळके यांच्या हस्ते तसेच संतोष परदेशी, ओंकार वर्तले, केतन ओसवाल, महेश काळे, सुरेंद्र (पप्पू) अशोकराव पानसरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापूजा संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे आयोजन डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट, गावातील भजनी मंडळ, श्री डोळसनाथ गणेशोत्सव मंडळ, उत्सव समिती व समस्त गावकरी यांनी केले होते.

सप्ताहाची सांगता मावळ दिंडी येणार नसल्याने मंगळवारी सकाळी 6 ते 8 काकड आरती होऊन काल्याचा अभंग घेऊन महाराजांची आरती करून प्रसाद वाटप करून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.