Talegaon News : विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून पुसाणे गावचा सर्वांगीण विकास ग्रामस्थांनी साधावा – गणेश काकडे

एमपीसी न्यूज – पुसाणे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बबन वाजे व उपाध्यक्ष पदी परशुराम शंकर आवंडे यांची बिनविरोध निवड झाली, त्यानिमित्त विजयी उमेदवारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी काकडे बोलत होते.

विविध कार्यकारी सोसायटी ही ग्रामीण भागातील लोकजीवनाचा आर्थिक कणा असून विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे मत तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_II

अध्यक्ष ज्ञानेश्वर बबन वाजे यांचा सत्कार गणेश काकडे यांच्या हस्ते व परशुराम शंकर आवंडे यांचा सत्कार आरपीआय तळेगाव दाभाडे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते झाला.

या प्रसंगी किशोर आवारे, नगरसेवक निखिल भगत, अनिल पवार, मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, पुसाणे गावचे माजी सरपंच धनाजी वाजे, विद्यमान सरपंच संजय आवंडे, माजी अध्यक्ष विकास वाजे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष ओव्हाळ, भैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष दिनेश आवारे, ज्येष्ठ नेते गुलाब वाजे, माजी अध्यक्ष बाजीराव वाजे, गोरख वाजे आदी उपस्थित होते.

गावात सलोख्याचे वातावरण असून भविष्यात विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून गावाचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर बबन वाजे यांनी या प्रसंगी नमूद केले. कल्पेश भगत यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.