Talegaon News : ज्याठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो त्याठिकाणी लक्ष्मीचा, ऐश्वर्याचा निवास – सुरेश साखवळकर

एमपीसी न्यूज – महिलांना त्यांचा सन्मान मिळाला पाहिजे, ज्या ठिकाणी महिला जीवनाचा सन्मान केला जातो, त्याठिकाणी लक्ष्मीचा, ऐश्वर्याचा निवास असतो. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर यांनी केले.

येथील तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने एसटीच्या तळेगाव आगरामध्ये कर्तव्य पार पाडत असलेल्या वाहक, लिपिक, सहाय्यक, नियंत्रक, स्वच्छता कर्मचारी महिलांच्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या सत्काराप्रसंगी साखवळकर बोलत होते.

तळेगाव एसटी आगरामध्ये झालेल्या या कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव अतुल पवार,ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, सुरेश साखवळकर, बी एम भसे, सुनील वाळुंज,श्रीकांत चेपे, प्रभाकर तुमकर यांच्यासह तळेगाव आगारातील मोहिनी बिडवे व वाहतूक निरीक्षक पल्लवी सुरकुले तसेच कर्मचारी उपस्थित होते.

साखवळकर पुढे बोलताना म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचे स्थान मोठे आहे. यथायोग्य मानसन्मान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होत आहे. स्त्रीचा सन्मान हा त्यांच्यावर केलेला उपकार नसून तो कुटुंबसौख्य, सर्वोत्तम वंशवृद्धी, निरोगी कुटुंब व समाजव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचेही साखवळकर यांनी सांगितले.

यावेळी तळेगाव एसटी आगारातील पल्लवी सुरकुले, मोहिनी बिडवे, सारिका अमृतकर, प्रज्ञा पंधारे, पुनम कोळी, आशा काटे, भाग्यश्री कांबळे, सुनंदा पवार, सरिता कुलकर्णी, स्वाती ढवळे, सुनिता डोळस, लता मुंडे, वंदना चरखे, प्रगती लाटे, जयश्री वाघमारे, आश्मत खलिफ, संगीता तोटेवाड, प्रणिता भालेराव आदी महिलांचा सत्कार शाल,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

प्रास्ताविक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले. सूत्रसंचालन अतुल पवार यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.