Talegaon News : केंद्रात व राज्यात सत्ता असताना पवना जलवाहिनी प्रकल्प का रद्द केला नाही ? : आमदार सुनील शेळके

एमपीसीन्यूज : भाजपचा या प्रकल्पास विरोध होता तर भाजपची केंद्रात व राज्यात सत्ता असताना हा प्रकल्प रद्द का केला नाही ? असा सवाल आमदार शेळके यांनी भाजपाच्या नेत्यांना केला आहे. मावळातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी त्याच तिकिटावर तोच खेळ करणे आता थांबवावा, असे वक्तव्य मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पवनाबंद जलवाहिनीवरील भाजपाच्या दुट्टपी भूमिकेवर केले. मावळातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी त्याच तिकिटावर तोच खेळ करणे आता थांबवावा, असे वक्तव्यही   आमदार  शेळके यांनी पवनाबंद जलवाहिनीवरील भाजपाच्या दुट्टपी भूमिकेवर केले.

मागील नऊ वर्षापासून बंद असलेल्या पवनाजलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हालचाली सुरु झाल्याने पवना बंद जलवाहिनीच्या चर्चेला उधाण आले आहे. 2011 रोजी पवना बंद जलवाहिनीच्या प्रकल्पास विरोध करताना मावळातील 3 शेतकरी शहीद झाले होते. तर काही जखमी झाले होते.

याचे भावनिक राजकारण करून आमचा पवना बंद जलवाहिनीच्या प्रकल्पास विरोध असल्याचे मावळमधील जनतेला भासविले जात आहे. तर दुसरीकडे पवना बंद जलवाहिनीचे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करु, असे पिंपरी- चिंचवडकरांना सांगून 2011 पासून पवना बंद जलवाहिनीच्या नावाखाली मतांचे राजकारण केले जात आहे.

तसेच पवना बंद जलवाहिनी सोडून त्यांच्याकडे दुसरा कोणताच मुद्दा नाही. एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते पवनाबंद जलवाहिनी प्रकल्पाला पाठींबा देत आहेत. तर दुसरीकडे मावळ मधील भाजपाचे पुढारी त्यास विरोध करत आहेत. यावरुन भाजपची दुट्टपी भूमिका स्पष्ट होत आहे.

भाजपाचा बंद जलवाहिनीस विरोध असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांची या संदर्भातील पक्षाची भूमिका स्थानिक पुढाऱ्यांनी लेखी स्वरुपात आणावी. जर त्यांचाही बंद जलवाहिनीस विरोध असेल तर आम्हीही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करु, असे आमदार शेळके म्हणाले.

भाजपची दुटप्पी भूमिका मावळच्या जनतेच्या लक्षात आली आहे. या प्रकल्पाबाबत भाजप आपली भूमिका स्पष्ट करत असताना स्थानिक शेतकरी किंवा भूमिपुत्र जो निर्णय घेत असतील त्याला पाठिंबा द्यावा.

तुमच्या राजकारणामध्ये माझ्या स्थानिक भूमिपुत्रांची, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये याचे देखील भान ठेवावे. स्थानिक शेतकरी, नागरिक यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन योग्य निर्णय घ्यावा. राजकीय व्यक्तींनी यापासून दूर रहावे, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.