Talegaon News : मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविणार : आमदार सुनील शेळके

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील कार्यालयासमोर 'संबळ बजाव' आंदोलन कऱण्यात आले.

एमपीसीन्यूज -मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी अग्रेसर राहणार आहे. माझ्या मराठा बांधवांसाठी विधानसभेत आवाज उठवणार. प्रसंगी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाई सोबत राहणार असल्याची ग्वाही आमदार सुनील शेळके यांनी दिली.

मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी मावळ तालुक्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील कार्यालयासमोर गुरुवार (दि.17 सकाळी साडे अकरा वाजता ‘संबळ बजाव’ आंदोलन कऱण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके यांना निवेदने देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, उपाध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसींगचे नियम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मराठा सेवा संघ मावळचे अध्यक्ष समाधान सुशीर पाटील, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे, संघटक नवनाथ कंधारे, अनिल मालपोटे, सचिव संभाजी भानुसघरेे, ज्ञानेश्वर लोभे, नारायण मालपोटे, नकुल भोईर, गणेश सरकटे, अभिषेक म्हसे, सागर तापकीर, राजू पवार, गणेश भांडवलकर, कृष्णा मोरे, सचिन आल्हाट आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

“संभाजी ब्रिगेडचे  जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहीभाते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे काढण्यात आली त्याची नोंद जगात घेतली. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा आणि वेळप्रसंगी कायदा करण्यासाठी केंद्राला भाग पडावे. तसेच मराठा समाजाच्या इतर ही मागण्या पूर्ण कराव्यात.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.