Talegaon News : शिवशंभो स्मारक चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे शिवप्रेमींची तक्रार

एमपीसी न्यूज – अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवशंभोचे स्मारक तळेगाव दाभाडे शहरात होत आहे. नगरपरिषदेच्या समोरील जागेमध्ये सध्या या स्मारकाच्या चौथऱ्याचे काम सुरू आहे. हे काम एकदम धीम्या गतीने आणि निकृष्ट दर्जाचे असून या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शिवप्रेमी करत आहेत.

शिवप्रेमी सुनील गायकवाड यांनी याबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्य मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गायकवाड आपल्या निवदेनात म्हणतात, सध्या सुरू असलेल्या शिवशंभो स्मारक चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून अगदी धीम्या गतीने काम सुरू आहे. निविदेत दिल्याप्रमाणेच बांधकामासाठी आवश्यक सिमेंट, स्टील, डबर वापरले जात आहे का ? याची पाहणी होणं आवश्यक आहे.

पूर्वीच्या वॉल कंपाऊंड चे काढलेले डबर बांधकामासाठी वापरले जात आहे. चौथर्‍यात वापरण्यात येणाऱ्या  स्टीलचा दर्जा, कामानंतर त्यावर पाणी मारणे आदी गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे गायकवाड यांनी निवेदनात म्हंटले आहे. चौथऱ्याच्या कामाचे ऑडिट करून त्याची उभारणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, नगरपरिषदेकडून घेतलेल्या पैशांच देखील ऑडिट करण्याची मागणी गायकवाड यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.