Talegaon News : कामगार हाच खरा देशाचा कणा – किशोर आवारे

एमपीसी न्यूज – विविध क्षेत्रातील कामगार बंधू हाच खरा देशाचा कणा असून देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी कामगारांचे हित जपले पाहिजे असे मत जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी (दि 1 मे) जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने येथे व्यक्त केले.

टाटा मोटर्स कार प्लांट या कंपनीतील तळेगाव दाभाडे व परिसरातील कामगार बंधूनी जनसेवा विकास समिती पुरस्कृत जनसेवा थाळीला सदिच्छा भेट देऊन उपक्रमाला अन्न धान्य प्रदान केले.

जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कामगार बंधूंना किशोर आवारे यांनी शुभेच्छा दिल्या.

टाटा मोटर्स कार प्लांट येथील गुणवंत कर्मचारी कैलास काशीद, निवृत्ती कंधारे, राजेंद्र बनसोडे, अर्जुन वारींगे यांचा कामगार दिना निमित्त प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे परिसरात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. सर्व कंपन्यांतील कामगारांच्या मागे ठाम पणे भविष्यात उभे राहू, तसेच कामगार हाच खरा देशाचा कणा आहे असे किशोर आवारे यांनी या वेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक अनिल धर्माधिकारी यांनी केले. या प्रसंगी प्रवक्ते मिलिंद अच्युत, नगरसेवक रोहित लांघे, नगरसेवक समीर खांडगे, अनिल पवार, अनिल कारके, दिलीप डोळस, दिलीपभाई शाह, नाना कारंडे, महेश सरोदे, अजित पालव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.