Talegaon News : बांधकाम व्यावसायिक उल्हास भगत यांचे निधन

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे ( ता. मावळ ) येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उल्हास लक्ष्मण भगत (वय 61) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. 1) निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

उल्हास भगत यांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून बांधकाम व्यवसायात पदार्पण केले होते. गेली 30 वर्षांहून अधिक काळ त्यांनी बांधकाम क्षेत्रात नावलौकिक मिळविला होता.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती निखिल भगत आणि गौरव हार्डवेअरचे संचालक, उद्योजक गौरव भगत यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.