Talegaon: गुरुपौर्णिमेनिमित्त फेसबुक लाइव्ह करत ‘कलापिनी’ने केली गुरुवंदना

Talegaon: On the occasion of Guru Poornima, 'Kalapini' performed Guruvandana live on Facebook अशोक सोनाळकर व सुजाता सोनाळकर यांना गुरुस्थानी मानून आदित्य धामणकर व हरीश पाटील यांनी गुरुपूजन केले.

एमपीसी न्यूज- गुरुपौर्णिमेनिमित्त कलापिनी संस्थेच्या वतीने गुरुवंदन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा संस्थेच्या वतीने श्रीमती पुष्पलता अरोरा स्मृती पुष्प गुरुवंदनेचा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह करत पार पडला.

सामाजित अंतर राखत आणि कोविड-19 चे नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला. महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीचे निवृत्त महाव्यवस्थापक अशोक सोनाळकर, सुजाता सोनाळकर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्याच्या हस्ते नटराज पूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कलापिनीच्या कलाकारांनी विविध कला सादर केल्या. कलापिनीच्या व इतर स्पर्धेतील पारितोषिक विजेता गायक अक्षय म्हाप्रळकर याने आपल्या गायनातून गुरुवंदना सादर केली. प्रदीप जोशी (संवादिनी) व अनिरुद्ध जोशी (तबला) यांनी साथसंगत केली.

माधुरी कुलकर्णी यांनी “गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू” या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर सुंदर निरुपण केले. हरहुन्नरी कलाकार श्रीधर कुलकर्णी यांनी लॉकडाऊनच्या काळात मुलांसाठी उपक्रम राबवल्याबद्दल गौरव करण्यात आला. या उपक्रमातील १०१ वी गोष्ट ‘कान पकडा’ हा कार्यक्रमात सादर केला.

कलापिनीचे युवा कलाकार खयालची धुरा वाहणारे शार्दुल गद्रे व चेतन पंडित यांच्या प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. आदित्य धामणकर व हरीश पाटील यांनी ‘बाबांची खिचडी’ ही नेटकी नाटिका सादर केली. कलापिनी कुमार भवनचा कलाकार चीत्रांषू तापस याने त्याच्या पाठ्य पुस्तकातील ‘चुडीवाला’ या धड्यावर आधारित सुंदर साभिनय कथा कथन केले.

प्रमुख अतिथी अशोक सोनाळकर व सुजाता सोनाळकर यांना गुरुस्थानी मानून आदित्य धामणकर व हरीश पाटील यांनी गुरुपूजन केले. यावेळी अशोक सोनाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कलापिनी रंगमंचाच्या उभारणीसाठी 1 लाख रुपयांची देणगी देणाऱ्या पांढरे दाम्पत्यांचाही गौरव करण्यात आला. कलापिनीचे आजीव सदस्य शशांक ओगले यांनी रंगमंच उभारणीसाठी 1 लाख रुपयांची देणगी दिली. अशोक सोनाळकर यांनीही कलापिनी रंगमंचासाठी 10 हजार रुपयांची देणगी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुवंती रानडे व कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कलापिनीचे सहसचिव अशोक बकरे, शार्दुल गद्रे, चेतन पंडित, चैतन्य जोशी, रश्मी पांढरे, अनघा बुरसेव, प्रतीक मेहता यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like