Talegaon : सातव्या दिवशी मावळात कोरोनाला ब्रेक -मधुसूदन बर्गे

On the sixth day, break the corona in Maval - Madhusudan Barge

एमपीसीन्यूज – मावळात सलग सहा दिवस कोरोनाची साखळी तुटली नाही. मात्र, आज सातव्या दिवशी कोरोनाला मावळ तालुक्यात मध्ये ब्रेक मिळाला आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

मागील 17 दिवसात मावळ तालुक्यातील शहरी भागात 3, तर ग्रामीण भागात 9 रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

7 मे रोजी तळेगावात पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यापाठोपाठ 11 मे रोजी माळवाडी येथे एक सापडला होता. सुदैवाने हे दोन्ही रूग्ण निगेटिव्ह आले होते.

त्यानंतर 19 मे अहिरवडे, 20 मेला नागाथली, 21 मे रोजी वेहेरगाव व चांदखेड या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक तर 22 मेला तळेगाव, 23 मे पुन्हा चांदखेड येथे 4 रूग्ण आढळून आले. काल रविवार, दि 24 मे रोजी घोणशेत येथे एक कोरोना रूग्ण सापडला होता.

19 मे ते 24 मे या दिवसात कोरोनाची साखळी तुटलीच नाही. रोज एक या प्रमाणे सहा दिवस सतत कोरोनाचे रूग्ण सापडू लागल्याने मावळवासियांची चिंता वाढली होती. मात्र, आज सहाव्या दिवसा अखेर कोरोनाला ब्रेक मिळाला असून मावळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजपर्यंत चांदखेड वगळता इतर सर्व रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील सर्व व्यक्तीचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, घोणशेत येथील 9 व्यक्तींचे स्वॅब टेस्टसाठी नमुने काल पाठविण्यात आले होते.

त्यांचा चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.