BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : श्री क्षेत्र देहु येथे जाणाऱ्या दिंड्या तळेगावमार्गे मार्गस्थ

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – तुकाराम बिजसाठी श्री विठ्ठल नामाचा, तुकाराम महाराजांचा माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष करीत अनेक पायी जाणाऱ्या  दिंड्या श्री क्षेत्र देहु येथे तळेगाव स्टेशन परिसरातून चाकण रोडने मार्गस्थ झाल्या आहेत.

तळेगाव येथील स्टेशन परिसरातील वतन नगर आणि अनेक ठिकाणचे भाविक त्यांचे चहा-पाणी, नाष्टा, जेवणाची व्यवस्था करीत आहेत. या दिंड्या घाटाच्या खालून पनवेल परिसरातून येत आहेत. तळेगावात त्यांचा काहीवेळ विसावा होत आहे.

तेथे भजन किर्तन केले जात आहे. त्यानंतर त्या पुढे मार्गस्थ होत आहेत. आणि तळेगावकर त्यांना भक्तिमय वातावरणात निरोप देत आहेत. त्यामुळे तळेगावात अवघी दुमदुमली पंढरी असे वाटत आहे.

पनवेल ते श्री क्षेत्र देहु हनुमान पाटील महाराज यांचा पायी दिंडी सोहळा. या दिंडीस सत्यवान घोरपडे कुटुंबांनी अन्नदान केले.

.

HB_POST_END_FTR-A1
.