Talegaon : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

गणेश नारायण घुले (वय 34, रा. केशवनगर, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना माहिती मिळाली की, यशवंतनगर परिसरात गोलवलकर मैदानाजवळ एक व्यक्ती संशयितरित्या थांबली आहे. त्याच्याकडे पिस्तुल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून गणेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी 25 हजार २00 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करून त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे डी. बी. बाजगिरे, पोलीस कर्मचारी बंडू मारणे, दिलीप कदम, मनोज गुरव, आतिष जाधव, अमोल गोरे, सतीश मिसाळ यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.