Talegaon : पूर्ववैमनस्यातून एकाला लाकडी दांड्याने मारहाण 

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना मावळ तालुक्यातील बधलवाडी गावाच्या हद्दीत शनिवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
विश्वनाथ रवींद्र उडापे (वय 34, रा. बधलवाडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी एमआयडीसी तळेगाव पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 2) फिर्याद दिली. त्यानुसार सागर सुरेश भोसले, गुरुदेव सुदाम बधाले, संतोष प्रभाकर बधाले, सोमनाथ तबाजी बधाले (सर्व रा. बधलवाडी, ता. मावळ) व तीन अनोळखी आरोपी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कारमधून आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांना रस्त्यात अडविले. त्यानंतर शिवीगाळ दमदाटी  केली. तसेच लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.