Talegaon : रेस बेतली तरुणाच्या जीवावर; दोन दुचाकींच्या अपघातात 5 गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – तरुणांनी दोन दुचाकींची रेस लावली. रेस सुरु असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे एकच्या सुमारास शेलारवाडीजवळ कुंडमळा येथे घडली.

संजय केदारी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत आणि जखमी असे सहाजण शनिवारी (दि. 14) इंदोरी येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट मॅच खेळून सहाजण दुचाकीवरून परत येत होते. परत येत असताना शेलारवाडी येथे आल्यानंतर तरुणांनी दुचाकीची रेस लावली. रेस सुरु असताना दुचाकी चालवणा-या तरुणांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोन्ही दुचाकीचे आरसे एकमेकांमध्ये अडकले. यामुळे भीषण अपघात झाला.

अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता एकाचा तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.