Talegaon : संचारबंदीत घराबाहेर क्रिकेट खेळत असल्याची माहिती दिल्यावरून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – संचारबंदी सुरू असल्याने घराबाहेर विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही घराबाहेर क्रिकेट खेळणाऱ्या काही इसमांची नावे एकाने पोलिसांना दिली. या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली.

विकास शंभूवेल गजभिव (वय 31, रा बेथल कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिलिप मकासरे, अनिता फिलीप मकासरे, जाॅईल फिलीप मकासरे (सर्व रा. बेथल कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रविवारी दुपारी फिर्यादी यांना घराबाहेर बोलावले. ‘आम्ही क्रिकेट खेळत असल्याची माहिती पोलिसांना का सांगितली’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्याला पकडून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच शिवीगाळ करत फिर्यादी यांना दगडाने मारले. आरोपींनी कुत्र्याच्या पिंजऱ्याचे देखील नुकसान केले. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like