Talegaon : बनावट चावीच्या सहाय्याने एटीएममधून पावणे दहा लाख रुपये लंपास

एमपीसी न्यूज – बनावट चावीच्या सहाय्याने अनोळखी इसमाने एटीएम मधील नऊ लाख 71 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये घडली.

बँक व्यवस्थापक शैलेश गोपीनाथ पाखरे (वय 59, रा. येरवडा, पुणे) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 7 मार्च) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अनोखी इसमाने तळेगाव दाभाडे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश केला. बनावट चावीच्या सहाय्याने मशीनचा दरवाजा उघडला.

मशीनमधून चोरट्याने नऊ लाख 71 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.