Talegaon : महाराष्ट्र दिनानिमित्त ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्स, पोलीस बांधव, समाजसेवक, स्वच्छता मोहीम हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत. 20 मे रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्पर्धकांनी आपली चित्रे 9960818857 या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या स्पर्धेत गट अ- पहिली ते चौथी,

गट ब- पाचवी ते सातवी,

गट क – आठवी ते दहावी व खुला गट असे चार गट असतील. या चार गटांना प्रत्येकी रोख स्वरूपात अनुक्रमे प्रथम क्रमांकास एक हजार पाचशे एक रूपया(1501), द्वितीय क्रमांकास एक हजार एक रूपया (1001), तृतीय क्रमांकास सातशे एक रूपया (701) असे बक्षीस असून प्रत्येक गटातील तीनही क्रमांकांतील विजेत्यांना आकर्षक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देणार असल्याचे श्री  डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष गणेश काकडे यांनी सांगितले.

या आॅनलाईन स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे सुचना व अटी दिलेल्या आहेत. 

 1 स्पर्धकांनी काढलेले चित्र संयोजक समितीच्या 9822422641 व 9960818857 या दोन मोबाईल नंबरवर पी.डी.एफ. स्वरूपात पाठवावेत.

2 स्पर्धकांनी चित्राच्या वरील उजव्या कोप-यात आपले संपूर्ण नाव, इयत्ता, गट क्रमांक व स्वतःचा मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे.

3 स्पर्धेचा निकाल 12 जूनला जाहीर करण्यात येईल.

4 विजेत्या स्पर्धकांचा सन्मान कोरोनाचे संकट दूर झाल्यावर करण्यात येईल.

5 ऐनवेळी स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार संयोजकांना राखीव असेल.

या स्पर्धेसाठी अध्यक्षा रोटरी सन 2020- 21 रजनीगंधा खांडगे, डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दादासाहेब उ-हे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव व प्रकल्प प्रमुख मिलिंद शेलार (सर), सचिव, रोटरी क्लब आॅफ तळेगाव दाभाडे एमआयडीसी दशरथ जांभुळकर आदी मान्यवर संयोजक म्हणून काम पाहात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like