Talegaon : इंदोरी येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्ती गंभीर जखमी 

Chakan Accident

एमपीसी न्यूज – मावळ (Talegaon) तालुक्यातील इंदोरी येथे भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी घडली.

मुकेश तात्याबा चव्हाण (वय 52, रा. साईनगर, इंदोरी, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच 17/बीसी 0106) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Pune : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी 4 वाजता निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे शुक्रवारी सायंकाळी इंदोरी मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. ते मार्केटमध्ये पायी (Talegaon) चालत जात असताना भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यामध्ये चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार पळून गेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share