Talegaon : मला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्याचं नाव समोर आलंच पाहिजे – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळच्या जनतेने 94 हजार मतांनी मला निवडून दिले. त्याच ताकदीने लढत आहे. जेवढी कामे करता येतील, जेवढा वेळ देता येईल तेवढा देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे.(Talegaon) तालुक्यातील जनेतेने कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. कुणाच्या जीवावर उठण्यासाठी नाही, असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.

किशोर आवारे हत्या प्रकरणात सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचे नाव आले आहे. त्याच्या निषेधार्थ सुनील शेळके समर्थक एकत्र आले. त्यावेळी सुनील शेळके यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच अशा गंभीर प्रकरणांमध्ये कुणीही राजकारण करू नये, असेही सांगितले.

सुनील शेळके म्हणाले, “तालुक्यात अनेक ठिकाणी दहशत माजवण्याचे काम सुरु आहे. अराजकता माजवण्यामागील खरे सूत्रधार कोण आहेत, तेही जनतेला माहिती आहे. तालुक्यात शांतता कशी ठेवता येईल, याबाबत मी सरकारकडे पाठपुरवा करणार आहे. सुनील शेळके यांनी हत्या केली, अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला. (Talegaon) सर्वसामान्य नागरिक, लहान मुले सुद्धा सांगतात की, सुनील शेळके काय करू शकतो. तर सुनील शेळके फक्त आमच्यासाठी उभा राहू शकतो. कुणाच्याही जीवावर उठू शकत नाही. आज माझ्यासाठी जे रस्त्यावर उतरले. हाच माझा खरा परिवार आहे. अनेकांना येऊ नका म्हणून आवाहन केले.”

Pimpri : भीमशक्ती विद्यार्थी आघाडीच्या वतीने छत्रपति संभाजी महाराज यांची जयंती साजरी

मावळच्या जनतेने 94 हजार मतांनी निवडून दिले. त्याच ताकदीने लढत आहे. जेवढी कामे करता येतील. जेवढा वेळ देता येईल तेवढा देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. राजकारणात विरोधक संधी शोधत असतात. जिथे संधी मिळेल त्याचा कसा फायदा घेता येईल ते बघत असतात. कोरोना काळात मी सर्वांसाठी काम करत होतो. त्याच काळात माझ्या घरादाराची चौकशी सुरु होती. चौकशा करून कोर्टापर्यंत खेचण्याचे काम केले. तुमची नितीमत्ता चांगली असू द्या. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तो पर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करत राहील.

काल दाखल झालेल्या गुन्ह्यात आमची नावे आली. आम्ही तर नातेवाईक नाही. पण जे नातेवाईक आहेत, त्यांचीही या हत्या प्रकरणात नावे आली. कोण कटकारस्थान करतंय हे जनतेला माहिती आहे. पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. पोलीस सत्य शोधून बाहेर आणतीलच. (Talegaon) पोलिसांच्या कामावर माझा विश्वास आहे. सुनील शेळके राजकारणात असो किंवा नसो. पण कधीच चुकीचे काम करणार नाही. पैसा, संपत्तीसाठी राजकारणात आलो नाही.

तपासात सगळ्या बाबी समोर येतील. पण तपास झाल्यानंतर माझं मागणं एकच असेल की, माझं नाव कोणी घ्यायला लावलं, हे मला माहिती झालं पाहिजे. भाजप किंवा शिवसेनेच्या कोणत्या गटाचे वरिष्ठ नेते या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणत असतील, असे काहीही नाही. पण जे कोणी असतील त्यांची नावे समोर येतीलच, असेही शेळके म्हणाले..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.