Talegaon : हिंदमाता पुलाजवळ पिकअप अडकले

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील हिंदमाता भुयारी मार्गाजवळ लोखंडी (Talegaon) कमानीचा अंदाज न आल्याने कमानी मध्ये पिकअप अडकला. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी घडली.

 

अभी ठुले (रा. ओझर्डे) असे जखमी पिकअप चालकाचे नाव आहे.

 

Ravet : किराणा दुकानाला लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक

 

मिळालेल्या माहितीनुसार, अभी ठुले हा त्याच्या ताब्यातील पिकअप (एमएच 14/सीपी 1628) तळेगाव दाभाडे येथून घेऊन जात होता. हिंदमाता भुयारी मार्गाजवळ आल्यानंतर त्याला भुयारी मार्गाच्या सुरुवातीला असलेल्या लोखंडी कमानीचा अंदाज आला नाही.

 

त्याने तसेच पिकअप पुढे नेले असता पिकअप कमानी मध्ये अडकले. यामुळे पिकअपचे मोठे नुकसान झाले. तसेच चालक अभी ठुले हा देखील जखमी झाला आहे. दरम्यान रस्त्यावर पिकअप अडकल्याने या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली (Talegaon) होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.